Join us

'गुलाबाची कळी..' गाण्यावर थिरकल्या ऐश्वर्या नारकर, व्हिडीओला मिळतेय पसंती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 19:27 IST

Aishwarya Narkar : ऐश्वर्या नारकर यांनी गुलाबाची कळी या गाण्यावरील रिल बनवला आहे. या रिलला चाहत्यांची पसंती मिळते आहे.

अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. त्यांनी मालिका आणि चित्रपटात विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. शेवटच्या त्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत पाहायला मिळाल्या होत्या. आता या मालिकेनं प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. मात्र अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रीय असून चाहत्यांना अपडेट देत असतात. दरम्यान आता ऐश्वर्या नारकर यांनी गुलाबाची कळी या गाण्यावरील रिल बनवला आहे. या रिलला चाहत्यांची पसंती मिळते आहे. 

ऐश्वर्या नारकर यांनी नुकतेच इंस्टाग्रामवर रिल शेअर केला आहे. या रिलमध्ये त्या गुलाबाची कळी या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. या व्हिडीओत त्यांनी काळ्या रंगाची साडी परिधान केली आहे. या साडीतील त्यांच्या सौंदर्यांने सर्वांना भुरळ घातली आहे. या व्हिडीओवर नेटकरी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रियाऐश्वर्या नारकर यांच्या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. एका युजरने लिहिले की, या वयात किती सुंदर दिसतेस. तर दुसऱ्या युजरने म्हटले की, अतिशय सुंदर. आणखी एकाने लिहिले की, छान गाण्याची आणि ठिकाणाची निवड केली आहेस. अनेकांनी या व्हिडीओवर हार्ट इमोजी, सुंदर, अप्रतिम अशा कमेंट केल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर यांनी अनेक चित्रपट, मालिका, नाटकात काम केले आहे. येल्लो, झुळूक या चित्रपटातील त्यांच्या भूमिकांचे कौतुक करण्यात आले आहे. त्यांचे पती अविनाश नारकर प्रसिद्ध अभिनेते आहेत. ऐश्वर्या आणि अविनाश यांनी १९९५ साली लग्न केले आहे. नुकतेच त्यांच्या लग्नाला २९ वर्ष पूर्ण झाली आहेत. सिनेइंडस्ट्रीतील ते क्युट कपल आहेत. ते दोघे सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतात. अनेक रील ते शेअर करताना दिसतात. त्यांच्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रतिसादही मिळतो. 

टॅग्स :ऐश्वर्या नारकर