Join us

मराठी कलाकारांचा एअरपोर्टवर सेल्फी

By admin | Updated: February 27, 2017 02:44 IST

सध्या प्रत्येक व्यक्तीसाठी सेल्फी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो.

मुंबई - सध्या प्रत्येक व्यक्तीसाठी सेल्फी हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. ‘जेथे जाऊ तिथे सेल्फी काढू’ हा जणू काही जगण्याचा नित्यनियमच बनला आहे. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांमध्ये सेल्फीची क्रेझ निर्माण झाली आहे. यामध्ये प्रेक्षकांचे लाडके कलाकारसुद्धा मागे राहिले नाहीत. बॉलिवूड असो वा मराठी कलाकार प्रत्येकजण सेल्फीच्या प्रेमात पडलेला आहे. आता हेच पाहा ना, प्रेक्षकांची लाडकी गायिका बेला शेंडे हिनेदेखील नुकताच एक झक्कास सेल्फी सोशल मीडियावर अपलोड केला आहे. त्यांचा हा सेल्फी शारजाह विमानतळावरील आहे. हा सुंदर सेल्फी अभिनेता अभिजित खांडकेकर याने क्लिक केला आहे. या सेल्फीमध्ये नेहा पेंडसे, बेला शेंडे, आदर्श शिंदे, श्रुती मराठी, पुष्कर श्रोत्री या कलाकारांचा समावेश आहे. त्याचबरोबर दुबई कॉलिंग म्हणत तिने पोस्टदेखील अपडेट केली आहे. त्यांच्या या सेल्फीला सोशल मीडियावर प्रचंड लाइक्स मिळत आहेत. त्याचबरोबर कमेन्टदेखील मोठ्याप्रमाणात मिळाल्या आहेत. त्यांच्या या लांबच्या पल्ल्यासाठी त्यांना शुभेच्छादेखील देण्यात आल्या आहेत. हे सर्व कलाकार एका शोसाठी दुबईला पोहोचले असल्याचे कळते.