OTT Trending Movie: गेली दोन-तीन वर्ष मागे वळून पाहिलं तर बॉलिवूडमधील काही मोजकेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरले. विकी कौशलच्या छावा चित्रपटानंतर मोहित सुरी दिग्दर्शक 'सैयारा' २०२५ मध्ये सर्वांत जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी एक असा हा चित्रपट आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिस अक्षरश: गाजवलं होतं. सिनेमागृहांमध्ये यश मिळवल्यानंतर, आता हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित करण्यात आला. त्यानंतर ओटीटीवर देखील या प्रेमपटाने दबदबा निर्माण केला आहे.
यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली बनवलेल्या या चित्रपटाद्वारे अहान पांडे आणि अनीत पड्डा इंडस्ट्रीत पदार्पण केलं आहे. जेन-झी ची लव्हस्टोरी सांगणाऱ्या सैयाराचं अनेक समीक्षकांसह सिनेरसिकांनी तोंडभरुन कौतुक केलं. अवघ्या ४५ कोटींच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने जगभरात ५०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली. हा चित्रपट मोहित सुरी यांच्या करिअरमध्ये मैलाचा दगड ठरला. क्रिश कपूरआणि वाणी बत्रा यांची लव्हस्टोरी दाखवण्यात आली आहे.
'सैयारा' ने ५० दिवसांहून अधिक काळ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई केली आणि आता हा चित्रपट ओटीटीवर धुमाकूळ घालत आहे. हा चित्रपट १२ सप्टेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर काही तासांतच सैयाराने टॉप-१० चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. सध्या हा चित्रपट ओटीटीवर ट्रेंडिंग आहे.