Join us
Daily Top 2Weekly Top 5

हा चिमुकला छोट्या पडद्याद्वारे जिंकतोय प्रेक्षकांचे प्रेम, साकारतोय मालिकेत मुख्य भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 20:21 IST

या फोटोत हा चिमुकला तबला वाजवताना दिसत आहे.

ठळक मुद्देया फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं... संगीतकार होण्याचं...

अग्गंबाई सूनबाई या मालिकेतील अद्वैत दादरकर सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. तो त्याचे फोटो, व्हिडिओ पोस्ट करत असतो. त्याने नुकताच त्याचा एक लहानपणीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला असून तो चांगलाच व्हायरल झाला आहे. या फोटोत अद्वैत खूपच गोड दिसत असल्याचे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे.

अद्वैतने शेअर केलेल्या या फोटोत तो तबला वाजवताना दिसत आहे. या फोटोसोबत त्याने लिहिले आहे की, लहानपणी मी पाहिलेलं मोठं स्वप्न होतं... संगीतकार होण्याचं... हा फोटो त्याच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

अद्वैतने याआधी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील त्याची भूमिका चांगलीच गाजली होती. अद्वैतचे मराठी नाट्यक्षेत्रात देखील खूप योगदान आहे. मराठी रंगभूमीवर त्याच्याप्रमाणेच त्याची पत्नी देखील देखील प्रसिद्ध आहे. अद्वैत दादरकरची पत्नी भक्ती देसाई असून तिच्या तू म्हणशील तसं या नाटकात ती दिसली होती. या नाटकांचे दिग्दर्शन प्रसाद ओकने केले होते तर या नाटकाची निर्मिती प्रशांत दामले यांनी केली होती. तसेच या नाटकात तिच्यासोबत संकर्षण कऱ्हाडे महत्त्वाच्या भूमिकेत होता. 

टॅग्स :अग्गंबाई सूनबाई