Join us

पुन्हा ‘रानभूल’!

By admin | Updated: November 15, 2014 23:07 IST

दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी एके काळी गाजवलेले ‘रानभूल’ हे नाटक त्यांच्या स्मृतिदिनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. येत्या 7 डिसेंबरला हे नाटक नव्या संचात सादर होणार आहे.

दिवंगत अभिनेते विनय आपटे यांनी एके काळी गाजवलेले ‘रानभूल’ हे नाटक त्यांच्या स्मृतिदिनी पुन्हा रंगभूमीवर येत आहे. येत्या 7 डिसेंबरला हे नाटक नव्या संचात सादर होणार आहे. आपटे यांनी गाजवलेली ‘रंगा’ची भूमिका करणार आहे संजय नाव्रेकर. याचं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे हे नाटक 25 वर्षापूर्वी जेव्हा रंगभूमीवर आलं, तेव्हा या नाटकासाठी म्युङिाक ऑपरेटरचं काम संजय करायचा. प्र. ल. मयेकर यांनी लिहिलेलं हे नाटक फिरत्या रंगमंचावर आले होते.  अथर्व थिएटर्स व श्रीचतुर्थी या बॅनरखाली हे नाटक रंगभूमीवर येत आहे. या नाटकाच्या दिग्दर्शन मंगेश कदम करत आहे. या नाटकासाठी नेपथ्यकार प्रकाश मयेकर यांनी खास फिरता रंगमंच बनवून घेतला आहे. हे नाटक जेव्हा रंगभूमीवर आलं, तेव्हा विनय आपटे यांच्याकडून आपल्याला बरंच काही शिकायला मिळालं. आता या नाटकात त्यांनी गाजवलेली भूमिका करून मी त्यांना आदरांजली वाहत आहे, अशी संजय नाव्रेकरची नम्र भावना आहे.