Join us

सात महिन्यांच्या ब्रेकनंतर ऐश्वर्या ‘या’ चित्रपटात

By admin | Updated: June 9, 2017 02:41 IST

ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर आपला जलवा दाखवायला सज्ज झाली

ऐश्वर्या राय बच्चन पुन्हा एकदा सिल्व्हर स्क्रिनवर आपला जलवा दाखवायला सज्ज झाली आहे. ऐश्वर्याने राकेश ओमप्रकाश मेहरांचा चित्रपट साईन केला आहे. राकेश ओमप्रकाश मेहरा आणि ऐश्वर्या राय ‘फॅनी खान’ या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच एकत्र काम करत आहे. अभिषेक बच्चन याने राकेश मेहरा यांच्यासोबत ‘दिल्ली ६’ या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटाबाबत अजून जास्त काही माहिती मिळाली नाही. ऐश्वर्या काही महिन्यांपूर्वी करण जोहरच्या ‘ऐ दिल है मुश्किल’ मध्ये दिसली होती. ती म्हणते, ‘ऐ दिल है मुश्किल’ चित्रपटानंतर ब्रेक घेऊन ती खूश आहे. यानंतर तिने आपल्या खासगी आयुष्याला वेळ दिला. या वर्षांच्या अखेरीस या चित्रपटाची शूटिंग सुरु होण्याची शक्यता आहे. या चित्रपटात ऐश्वर्यासोबत अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तब्बल १७ वर्षांनंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या एकत्र काम करणार आहेत.