Join us
Daily Top 2Weekly Top 5

सारानंतर इब्राहिम लवकरच करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, वडील सैफने केले असे स्वागत

By तेजल गावडे | Updated: November 4, 2020 14:00 IST

सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

अभिनेता सैफ अली खानने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता त्याचा मुलगा इब्राहिमदेखील आपल्या वडीलांच्या पावलांवर पाउल टाकण्यासाठी सज्ज झाला आहे. 

स्पॉटबॉयच्या रिपोर्ट्सनुसार, सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. या वृत्ताला स्वतः सैफने दुजोरा देत आपल्या मुलाचे स्वागत केले आहे. सैफच्या नुसार, त्याची नेहमीच इच्छा होती की त्याचा मुलगा इब्राहिमने बॉलिवूडमध्ये एन्ट्री करावी. त्याची सारा आणि इब्राहिम या दोघांनी अभिनय क्षेत्रात काम करावे ही इच्छा होती. बऱ्याच काळापासून ही चर्चा होती की इब्राहिम लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. पण तेव्हा अधिकृत माहिती मिळाली नव्हती. त्यामुळे ही अफवा मानली जात होती. मात्र आता सैफला वाटते की त्याचा मुलगा आता बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी तयार आहे. आता अभिनय करण्यासाठी फिट आहे.

सैफ म्हणाला की, इब्राहिम तयार झाला आहे. माझी इच्छा आहे की माझे सर्व मुले या क्षेत्रात कार्यरत रहावी. ही बेस्ट जागा आहे काम करण्यासाठी.सैफ अली खानच्या नुसार, बॉलिवूडमध्ये काम केल्यानंतर त्याला कामातून समाधान मिळाले आहे आणि तिथे त्याला खूप आनंदी वाटते. अशात तो इब्राहिमला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी प्रोत्साहन देत असतो.

इब्राहिम अली खानला आपले आजोबा मंसूर अली खान पटौदी यांच्यासारखा क्रिकेटची आवड आहे. या खेळात इब्राहिम तरबेज असल्याचे म्हटले जाते. मात्र जेव्हा इब्राहिमला क्रिकेट आणि एक्टिंग यापैकी एका क्षेत्राची निवड करायला सांगितली. तेव्हा त्याने एक्टिंग क्षेत्राची निवड केली. आता तो कोणत्या चित्रपटातून पदार्पण करतो, हे पाहणे कमालीचे ठरेल.

टॅग्स :सैफ अली खान सारा अली खानइब्राहिम अली खान