Join us
Daily Top 2Weekly Top 5

करणपाठोपाठ 'हे' सेलिब्रिटी कपल बनले पालक

By admin | Updated: March 7, 2017 11:36 IST

मोठ्या तसेच छोट्या पडद्यावर गाजलेला अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ७ - सरोगसीद्वारे जुळ्या मुलांचा पिता बनल्यामुळे बॉलिवूड दिग्दर्शक करण जोहर चर्चेत आलेला असतानाच आता आणखी एक सेलिब्रिटी 'पालक' बनले आहेत. मोठ्या तसेच छोट्या पडद्यावर गाजलेला अभिनेता गुरमीत चौधरी आणि त्याची पत्नी देबिना बॅनर्जी यांनी दोन मुलींना दत्तक घेतले आहे. पूजा आणि लता अशी त्या दोघींची नावे असून यासंबंधीची कायदेशीर प्रक्रियाह लवकरच पूर्ण होईल. 
गुरमीत आणि देबिना या दोघांनाही फॅमिलीबद्दल, मुलांबद्दल प्रश्न विचारले जायचे, अखेर त्यांनी या दोन मुलींना दत्तक घेत सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या दोघीही बिहारमधील एका आश्रमात रहात असून त्या चुलत बहिणी आहेत. सध्या घडीला त्यांना मुंबईत आणणे कठीण असल्याने वर्षभरासाठी त्या बिहारमध्येच राहतील असे गुरमीतने स्पष्ट केले 
गुरमीत आणि देबिना यांच्या लग्नाला सहा वर्षे झाली असून त्यांना अपत्य नव्हते. त्यामुळे त्यांना नेहमीच मुलांबाबत प्रश्न विचारले जायचेय अखेर त्या दोघांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला.