Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रिती झिंटा पाठोपाठ उर्मिला मातोंडकर विवाहबद्ध

By admin | Updated: March 3, 2016 20:54 IST

प्रिती झिंटा पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही विवाहबद्ध झाली आहे. काश्मिर स्थित व्यावसायिक आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर बरोबर उर्मिलाने लग्न केले.

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. ३ - प्रिती झिंटा पाठोपाठ बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरही विवाहबद्ध झाली आहे. काश्मिर स्थित व्यावसायिक आणि मॉडेल मोहसीन अख्तर मीर बरोबर उर्मिलाने लग्न केले. बॉलिवूडमधल्या अन्य कलाकारांप्रमाणे उर्मिलाने आपल्या विवाहाची प्रसिद्धीमाध्यमांमध्ये फारशी चर्चा होऊ दिली नाही. 
हा अत्यंत खासगी आणि घरगुती स्वरुपाचा विवाह सोहळा होता. बॉलिवूडमधून फक्त फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा या विवाहाला उपस्थित होता. उर्मिलाचा तो जवळचा मित्र आहे. 
आमच्या दोन्ही कुटुंबाना हा विवाहसोहळा खासगी स्वरुपाचा ठेवायचा होता आणि आम्ही सुद्धा त्यासाठी तयार होतो. आम्ही आयुष्यातील नव्या प्रवासाला सुरुवात करत आहोत. आम्हाला तुमचा आर्शिवाद हवा आहे असे उर्मिलाने सांगितले. रंगीला, सत्या, प्यार तुने क्या किया सारख्या चित्रपटांमधून आपली छाप उमटवणारी उर्मिला मागच्या काहीवर्षांपासून चित्रपटसृष्टीत फारशी सक्रीय नव्हती.