ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. १५ - प्रदर्शनापूर्वी 'ए दिल है मुश्कील' चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु असताना अभिनयाचे शेहनशहा अमिताभ बच्चन मौन धारण करुन होते. पाकिस्तानी कलाकार फवाद खानच्या वादाबरोबरच ऐश्वर्या राय बच्चनच्या हॉट, बोल्ड सीन्सचीही सर्वत्र चर्चा होती.
एरवी सोशल मीडियावर सक्रीय असणा-या अमिताभ यांनी सूनेच्या भूमिकेबद्दल एक चकार शब्दही काढला नाही. ऐश्वर्याने दिलेल्या हॉट दृश्यांवर बच्चन कुटुंब नाराज असल्याची चर्चा होती.
पण आता अमिताभ यांना एडीएचम बघायला वेळ मिळाला असून त्यांना या चित्रपटातील ऐश्वर्याची भूमिका आवडली. कोलकाता फिल्म फेस्टीव्हलच्या कार्यक्रमाला अमिताभ प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. यावेळी त्यांनी ऐश्वर्याच्या रोलचे कौतुक केले. स्वत: अमिताभ यांनी बूम, निशब्द या चित्रपटात उतारवयात बोल्ड भूमिका केल्या आहेत. परंतु, बच्चन यांना ऐश्वर्याची बोल्ड भूमिका आवडली नाही, अशी अफवा पसरली होती, जिला पूर्णविराम मिळायला हरकत नाही.