Join us

तब्बल 20 वर्षानंतर ही मराळमोळी अभिनेत्री करते कमबॅक, नाव वाचून व्हाल थक्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 15:30 IST

मराठी आणि हिंदी टीव्ही इंडस्ट्रीमध्ये या अभिनेत्रीचा मोठ्या चाहता वर्ग आहे. तिने मराठीसह अनेक हिंदी मालिंकामध्ये देखील काम केलं आहे.

झी मराठीवरील 'तू तेव्हा तशी' (Tu Tevha Tashi) या आगामी मालिकेने प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला नेली आहे. या मालिकेचा फक्त टिझर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये या मालिकेची चर्चा आहे. या मालिकेतून पहिल्यांदाच स्वप्नील जोशी (Swapnil Joshi) आणि शिल्पा तुळसकर (Shilpa Tulaskar) हि जोडी छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत स्वप्नील सौरभची तर शिल्पा अनामिका दीक्षितची भूमिका साकारणार आहे. तू तेव्हा तशी हि गोष्ट आहे अव्यक्त प्रेमाची. हि मालिका २० मार्च पासून रात्री ८ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

तू तेव्हा तशी या आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना शिल्पा म्हणाली, "मेघ दाटले या मालिकेनंतर जवळपास २० वर्षांनंतर 'तू तेव्हा तशी'मधून अनामिकाच्या प्रमुख भूमिकेतून मी प्रेक्षकांच्या भेटीला येतेय त्यामुळे खूप जास्त उत्सुकता आहे. मधल्या काळात मी अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये कॅमिओ केले पण पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेतून प्रेक्षकांच्या समोर येताना खूप आनंद होतोय. स्वप्नील आणि मी याआधी एकत्र काम केलं आहे पण तू तेव्हा तशी मधून पहिल्यांदांच प्रेक्षक आम्हाला प्रमुख जोडी म्हणून पाहू शकतील. स्वप्नील सोबत खूप वेळानंतर पुन्हा एकदा काम करतेय त्यामुळे एकत्र काम करताना ऑन-स्क्रीन, ऑफस्क्रीन एक पॉझिटिव्ह एनर्जी कायम असते. या मालिकेचं कथानक खूपच वेगळं आणि सुंदर आहे. प्रेमाला वयाचं बंधन नसतं आणि या मालिकेतून ते सुंदररित्या मांडण्यात आलं आहे जे प्रेक्षकांना देखील आवडेल याची मला खात्री आहे." 

टॅग्स :झी मराठीटिव्ही कलाकारस्वप्निल जोशी