हिंदी मालिकांमध्ये यश मिळाल्यानंतर सध्या आदित्य मराठी चित्रपटांकडे वळला आहे. तो सध्या लव्ह बेटिंग, वळण, मी, आमचा विचार करा ना यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करत आहे. लव्ह बेटिंग या चित्रपटात तो स्मिता गोंदकर, चिराग पाटील, काजल शर्मा यांच्यासोबत झळकणार आहे, तर वळण या चित्रपटात दोन मित्रांची कथा दाखवली जाणार असून, जातीव्यवस्थेवर भाष्य केले जाणार आहे. त्याच्या मी या चित्रपटात एक राजकीय कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आमचा विचार करा ना या चित्रपटात प्रेक्षकांना त्याचे एक वेगळे रूप दिसणार आहे. या चित्रपटात तो एका लहान मुलाच्या वडिलांची भूमिका साकारत आहे.
आदित्य देशमुखला लागली चित्रपटांची लॉटरी
By admin | Updated: February 24, 2017 06:33 IST