Join us

तरुण रेखाच्या भूमिकेत अदिती

By admin | Updated: November 15, 2014 23:10 IST

चाल्र्स डिकन्स यांच्या ग्रेट एक्स्पेक्टेशंस या पुस्तकावर आधारित असलेल्या ‘फितूर’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कॅटरिना कैफ आणि रेखा मुख्य भूमिकेत आहेत.

चाल्र्स डिकन्स यांच्या ग्रेट एक्स्पेक्टेशंस या पुस्तकावर आधारित असलेल्या ‘फितूर’ या चित्रपटात आदित्य रॉय कपूर, कॅटरिना कैफ आणि रेखा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा तरुण काश्मिरी मुलगा त्याची प्रेयसी आणि चंचल बेगम यांच्यावर आधारित आहे. रेखा यांची भूमिका पुस्तकातील पात्र मिस हविषमवर आधारित आहे. या चित्रपटात तरुण रेखाची भूमिका अदिती राव हैदरी साकारणार असल्याची बातमी आहे. ‘फितूर’चे शूटिंग लवकरच सुरू होणार असून, दिल्ली, श्रीनगर आणि लंडनमध्ये चित्रपटाचे शूटिंग केले जाणार आहे.