Join us
Daily Top 2Weekly Top 5

आदिनाथ-ऊर्मिलाचा गुढीपाडवा

By admin | Updated: April 10, 2016 01:48 IST

नवीन वर्षाची सुरुवात आयुष्यात खूप सारा आनंद आणि चांगल्या गोष्टी घेऊन यावी यासाठी आपला मराठमोळा नवीन वर्षाचा सण गुढीपाडवा सर्व जण मोठ्या उत्साहात साजरा करतात.

नवीन वर्षाची सुरुवात आयुष्यात खूप सारा आनंद आणि चांगल्या गोष्टी घेऊन यावी यासाठी आपला मराठमोळा नवीन वर्षाचा सण गुढीपाडवा सर्व जण मोठ्या उत्साहात साजरा करतात. असाच गुढीपाडवा मराठी इंडस्ट्रीतील गॉर्जिअस कपल आदिनाथ कोठारे अन् ऊर्मिला कोठारे यांनी साजरा केला. आदिनाथ-ऊर्मिलाने पारंपरिक वेशात सजून नववर्षाची गुढी उभारली. ऊर्मिलाने हिरव्या रंगाची काठापदराची साडी नेसली होती. कानात झुमके, नाकात नथ अशा अस्सल ठसकेबाज मराठमोळ्या अंदाजात ऊर्मिला सजली असून, आदिनाथने यलो कलरचा कुर्ता घातला होता. दोघांचीही जोडी या पारंपरिक वेशात एकदमच झक्कास दिसत होती. आपल्या मराठीतील या पॉवर कपलला नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा!