- मृण्मयी मराठे
मराठी अभिनेत्री मॉड बनत आहेत, अनेक ‘हॉट’ छायाचित्रेही देत आहेत; पण सोशल साइटवर फिरणाऱ्या अभिनेत्रींच्या छायाचित्रांमध्ये मराठमोळ्या सौंदर्यालाच जास्त पसंती दिली जात असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, अनेक अभिनेत्रीही आपली मराठमोळी छायाचित्रे कशी सर्वत्र येतील, याचीच काळजी जास्त घेत आहेत. ‘बायोस्कोप’मधील सुंदर मुलगी मॉडर्न होती. वेगवेगळ्या ड्रेसमधील तिची छायाचित्रे या निमित्ताने झळकली. मात्र, स्पृहाने आपल्या फेसबुकवर अत्यंत मराठमोळा, अगदी ठसठशीत कुंकू असलेला फोटो ठेवला आहे. सई ताम्हणकरच्या फेसबुकवर मॉड फोटो असला, तरी सोशल साइटवर तिचे साडीमधील फोटो जास्त फिरतात. अर्थात, यामध्ये ‘हंटरर’ मधील हॉट फोटोंचाही समावेश आहे. ‘शटर’ चित्रपटात सोनाली कुलकर्णी संपूर्ण वेळ एकाच साडीत वावरली आहे. तिचेही वेगवेगळ्या पोझमधील साडीतील फोटो सध्या दिसतात. ‘नटरंग’मधील सोनाली अगदी दागिन्यांनी मढलेली आहे. तिचे दागिन्यांनी मढलेले फोटो जास्त दिसतात. तेजस्विनी पंडितचेही नव्या चित्रपटातील लूकमधील साडीमधील फोटो जास्त फिरत आहेत. ‘गर्ल नेक्स्ट डोअर’ अशी आपली इमेज कायम ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुक्ता बर्वेची अगदी कॅज्युअल लूकमधील फोटोच सध्या दिसतात. आगामी चित्रपटांमधील भूमिकेच्या पार्श्वभूमीवर नायिकांचे फोटो शेअर होण्याचे प्रमाण जास्त आहे. ‘शॉर्टकट- दिसतो पण नसतो’ मध्ये संस्कृती बालगुडेने इशिका नावाच्या मॉड मुलीची भूमिका केली आहे. सध्या तिचे मॉड फोटोच प्रामुख्याने दिसून येतात. एका शेतकऱ्याच्या पत्नीची भूमिका ‘बायोस्कोप’मधील ‘बैल’ या शॉटफिल्ममध्ये साकारणाऱ्या स्मिता तांबे हिचा फेसबुकवरील फोटो मॉड आहे. मात्र, भूमिकांच्या अनुषंगाने साडीमधील स्मिताच जास्त प्रमाणात फिरते. पूजा सावंत तिच्या नव्या चित्रपटाच्या निमित्ताने साडीमध्ये दिसत असली, तरी तिचे मात्र जास्त मॉड फोटोच आहेत. पंजाबी डे्रसपेक्षाही साडी कॅरी करणे मला अधिक सोपे वाटते. कोणतीही स्त्री ही साडीमध्येच सगळ्यात सुंदर दिसते, असं मला वाटतं आणि त्याशिवाय साडी ही भारतीय स्त्रियांची परंपरा आहे. त्यामुळे मी साडी नेसायलाच अधिक पसंती देते.- सई ताम्हणकरसाडी ही भारतीय स्त्रियांची परंपरा आहे. त्यामुळे एखादी भारतीय स्त्री म्हटले, की ती साडीतच इमॅजिन केली जाते. आणि मला असं वाटतं की साडी भारतीय स्त्रीलाच सर्वांत जास्त चांगली दिसते. शिवाय, साडी कॅरी करायलाही सोपी असते. - ऊर्मिला कानिटकर