आपल्या बोल्ड ड्रेसिंग सेन्ससाठी प्रसिद्ध असलेल्या अभिनेत्री उर्फी जावेदची (Urfi Javed) प्रकृती खालावली असून तिला रुग्णालयात दाखल केल्याचे वृत्त आहे. माध्यमांतील वृत्तानुसार गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती बरी नव्हती.
टीओआयने दिलेल्या वृत्तानुसार, उर्फी जावेदची प्रकृती गेल्या 2-3 दिवसांपासून बरी नव्हती. तिला सातत्याने उलट्या होत होत्या. तसेच, तिला 103 ते 104 एवढा तापही होता. यामुळे तिला तातडीने मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उर्फीच्या काही वैद्यकीय चाचण्या केल्या जात आहेत. त्यांचा अहवाल आल्यानंतर तिला नेमके काय झाले आहे, हे कळू शकेल.
उर्फी जावेद सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. मात्र, सध्या आजारी असल्याने तिने गेल्या दोन दिवसांपासून इन्स्टाग्रामवर कुठल्याही प्रकारची पोस्ट केलेली नाही. 4 जूनला तिने एक पोस्ट टाकली होती. ते एक टॉपलेस फोटोशूट होते. यात ती आपल्या केसांनी ब्रेस्ट कव्हर करताना दिसत आहे. तिच्या या फोटोशूटनंतर, सोशल मीडिया युजर्सनी दिला जबरदस्त ट्रोल केले होते.