बॉलीवूड अभिनेत्री काजोल एका अवॉर्ड फंक्शनमध्ये रेड कार्पेटवर चालताना अतिशय भावुक झाली होती़ यावेळी तिला स्वत:ला आवरताच आले नाही़ खूप दिवसानंतर ती आपला जुना मित्र मिकी कन्स्ट्रक्टरला भेटली होतीक़ाजोल मेकअप आर्टिस्ट मिकीला अनेक वर्षांपासून ओळखते़ दोघांनी ‘बेखुदी’ चित्रपटात सोबत काम केले होते़ त्यानंतर दोघे चांगले मित्र बनले़ या दोघांनी चित्रपटाशिवाय बाहेरदेखील सोबत काम केले आहे़ हे दोघे पुन्हा एकदा अनेक वर्षांनंतर भेटल्यामुळे ते बराच वेळ बोलत होते़ येथे उपस्थित सर्वजण काजोलचे हे रूप बघून चकित झाले़ मात्र, थोड्या वेळातच काजोलने स्वत:ला सावरले़
रेड कार्पेटवर रडली ही अभिनेत्री़
By admin | Updated: July 28, 2014 03:17 IST