Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्रीच्या घरी चोरी, ३४ लाखांचे दागिने घेऊन मोलकरीण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 13:25 IST

काम करायला आली अन् दागिने घेऊन पळून गेली, अभिनेत्रीच्या घरी मोलकरणीचा कारनामा

लोकप्रिय अभिनेत्री नेहा मलिकच्या मुंबईतील घरी चोरी झाली आहे. अभिनेत्रीच्या घरातून मोलकरणीने तब्बल ३४ लाख किमतीचे दागिने घेऊन पळ काढला. या प्रकरणी अंबोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलं आहे. चोरी केलेल्या मोलकरणीचं नाव शेनाज शेख असून ती ३७ वर्षांची आहे. पोलिसांनी आरोपीला अंधेरीतील जेबी नगर येऊन अटक केली आहे. 

नेहा मलिक तिची आई मंजू मलिक यांच्यासोबत अंधेरी पश्चिममधीस अदानी हाइट्स कॉम्प्लेक्समध्ये राहत होती. शेनाज शेख त्यांच्या घरी फेब्रुवारी महिन्यापासून कामाला होती. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नेहाच्या आईने दागिने एका लाडकी कपाटात पिशवीत ठेवले होते. मोलकरणीने हे दागिने ठेवताना त्यांना पाहिलं होतं. जेव्हा घरात चोरी झाली तेव्हा मंजू मलिक या सकाळी ७.३० वाजता गुरुद्वारात गेल्या होत्या. त्यानंतर घरातील मोलकरणीने साफसफाई केली. घराचं भाडं भरायचं म्हणून मोलकरणीने त्यांच्याकडून ९ हजार रुपये अॅडव्हान्समध्ये घेतले होते. दुसऱ्या दिवशी मोलकरीण कामावर न आल्याने त्यांनी तिला फोन केला. परंतु, तिचा फोनच लागला नाही. तेव्हा शंका आल्याने मंजू यांनी घरात पाहिले असता दागिने गायब झालेले दिसले. 

२५ एप्रिल रोजी ही घटना घडली. दागिन्यांची चोरी झाल्याचं समजताच लगेचच मंजू यांनी नेहाला याबाबत सांगितलं. त्यानंतर लगेचच त्यांनी पोलिसांत धाव घेत तक्रार नोंदवली. यानंतर पोलिसांनी लगेचच अॅक्शन घेत आरोपी महिलेला अटक केली आहे.

टॅग्स :टिव्ही कलाकार