Join us
Daily Top 2Weekly Top 5

46 वर्षांच्या मलायका अरोराचे सेक्सी फोटोशूट; चाहत्यांनी दिल्या Super Hotच्या कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 15:27 IST

मलायकाचे हे फोटो पाहून तुम्हीही व्हाल फिदा

ठळक मुद्दे मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय.

मलायका अरोराचे फोटोशूट म्हटले की, पाहणारा दंग होणार. होय, मलायकाचे सेक्सी, हॉट व्हिडीओ पाहून चाहते घायाळ होतात. मलायकाचे ताजे फोटोशूटही असेच. तिचे हे फोटो तुम्हाला आश्चर्याचा धक्का देतील. मलायका 46 वर्षांची असून एका मुलाची आई आहे, हे सांगूनही पटणार नाही.या नव्या फोटोशूटमध्ये मलायकाचा सुपरहॉट अंदाज पाहण्यासारखा आहे.

ब्लॅक ट्राऊजर आणि सोबत ब्लॅक ट्यूब टॉपमध्ये तिने एकापेक्षा एक स्टनिंग पोज दिल्या आहेत. सोबत मस्टर्ड यॅलो कलरचे जॅकेट तिच्या सौंदर्यात भर घालत आहे. सध्या तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

चाहत्यांनी मलायकाच्या या फोटोंवर एकापेक्षा एक भारी कमेंट्स दिल्या आहेत. सुपर कुल, सुपर बोल्ड, हॉट अशा शब्दांत अनेकांनी मलायकाच्या या फोटोंचे कौतुक केले आहे. मलायकाचा हा ड्रेस मेनिक हरिसिंघानीने डिझाईन केलेला आहे.

तूर्तास मलायका ‘सुपरमॉडल आॅफ द इअर’ हा शो जज करतेय. मलायकाने याआधी ‘इंडियाज गॉट टॅलेंट’ या रिअ‍ॅलिटी शोची जज होती. नज बलिये,  जरा नचके दिया, झलक दिखला जा यासारखे अनेक रिअ‍ॅॅलिटी शो जज करताना ती दिसली आहे.

 मलायका सध्या अर्जुन कपूरला डेट करतेय. अर्जुन मलायकापेक्षा 11 वर्षांनी लहान आहे. यावरून मलायका अनेकदा ट्रोलही झाली. पण मलायकाने या ट्रोलिंगची कधीच पर्वा केली नाही. सध्या ती आपल्या जगात आनंदी आहे. लवकरच हे कपल लग्न करणार असे मानले जात आहे. 

टॅग्स :मलायका अरोरा