Join us

अभिनेत्री किशोरी शहाणे यांच्या गाडीचा गंभीर अपघात, समोरून येणाऱ्या ट्रकने दिली धडक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2022 12:04 IST

अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांच्या  गाडीचा भीषण अपघात (kishori shahane accident) झालाय.

अभिनेत्री किशोरी शहाणे विज यांच्या  गाडीचा भीषण अपघात (kishori shahane accident) झालाय. किशोर शहाणे यांनी सोशल मीडियावर अपघाताचे फोटो शेअर करत ही माहिती दिलीय. अपघात किती भीषण असा याचा अंदाज आपल्याला फोटो बघून येतोय. त्यांनी शेअर केलेले हे फोटो पाहुन त्यांनाही धक्का बसलाय. मात्र या अपघातातून किशोर शहाणे  थोडक्यात बचावल्या आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारची इजा झालेली नाही. त्या सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिलीय. 

किशोरी शहाणे या सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असतात. स्वतःचे अनेक फोटो त्या चाहत्यांसोबत शेअर करताना दिसून येतात. याशिवाय पतीसोबत आणि मुलासोबत टाईम स्पेंड करतानाचेही अनेक फोटो आणि व्हिडीओ त्या चाहत्यासोबत सतत शे्अर करताना दिसून येतात. किशोरी या मराठी सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत.  मात्र यावेळी किशोरी यांनी इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टने रसिकांच्या हृदयाचा ठोका चुकला.

किशोरी यांच्या गाडीला पवना लेक परिसरात गिरावण येथून येत असताना हा अपघात झाला आहे. हे फोटो शेअर करताना किशोरी शहाणे यांनी लिहिले आहे की,'आमच्या गाडीला अपघात झाला आहे. यात गाडीचं मोठं नुकसान झालं आहं. देवाच्या कृपेने आम्हाला कुणालाही कोणतीच इजा झालेली नाही. जाको राखे साईया मार सके ना कोई.' किशोरी शहाणे यांच्या या पोस्टवर चाहत्यांनीही कमेंट केल्या आहेत.  

टॅग्स :किशोरी शहाणेअपघात