Join us

शानदारमधील या अभिनेत्रींने केला गुपचुप साखरपुडा

By admin | Updated: January 15, 2017 07:40 IST

बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर प्रमाणेच त्याच्या बहिणीनेही गुपचुप साखरपुडा केल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहिद कपूरची बहिण 'शानदार' फेम सना कपूरने मयांक पहावाशी गुपचुप साखरपुडा उरकला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - बॉलिवूडचा अभिनेता शाहिद कपूर प्रमाणेच त्याच्या बहिणीनेही गुपचुप साखरपुडा केल्याचे वृत्त समोर आले आहे. शाहिद कपूरची बहिण 'शानदार' फेम सना कपूरने मयांक पहावाशी गुपचुप साखरपुडा उरकला आहे.  पण दोघांच्या कुटुंबीयांनी मात्र याबद्दल अद्याप कोणताही खुलासा केलेला नाही. 
 
दिवंगत अभिनेते ओम पुरी यांची पत्नी नंदिता यांच्या तोंडून या साखऱपुड्याची बातमी नकळतपणे बाहेर पडलीय. ओम पुरी यांच्याबद्दल सांगताना 'मी आणि ओम पुरी पंकज कपूर यांची मुलगी सना आणि मनोज पाहवा यांच्या मुलाच्या साखरपुड्यासाठी जाणार होतो. यासाठी ओम यांनी मला फोन केला होता. मी तिथं पोहचणार याआधीच ते माझ्या घरी दाखल झाले होते' असं नंदिता यांनी म्हटले आहे.