ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 21 - कॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत अनेकदा लैंगिक छळ होत असल्याचे एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने म्हटले आहे. वरालक्ष्मी सरतकुमार असे या अभिनेत्रीचे नाव असून तीने एका प्रमुख टीव्ही चॅनेलच्या मुख्य अधिका-यांवर ट्विटरटच्या माध्यमातून आरोप केले आहेत.
गेल्या आठवड्यात एका अभिनेत्रीचे अपहरण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी वरालक्ष्मी सरतकुमारने ट्विट केले आहे. यामध्ये ती म्हणाली, कॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीत महिलांची सुरक्षा म्हणजे एक मजेचा विषय आहे. मला एका टीव्ही चॅनलच्या मुख्य अधिका-याने काम झाल्यावर बाहेर भेटायला सांगितले. त्यावर मी त्याला विचारले काही काम आहे का? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, काही काम नाही. पण दुस-या गोष्टींसाठी. यावर मी राग शांत करत म्हणाले, माफ करा मला जाऊ द्या. या विषयावर हे शेवटचे शब्द होते. त्यावेळी तो अधिकारी हसला आणि तेथून निघून गेला, असे वरालक्ष्मी सरतकुमारने म्हटले आहे.
मी एक अभिनेत्री आहे. माझ्या म्हणण्याचा उद्देश असा नाही की, मी पडद्यावर काम करते म्हणून बोलते. तर, माझे जीवन आहे. माझे शरीर आणि माझ्यासुद्धा काही इच्छा असल्याचेही तीने म्हटले आहे.
Needs to be said..!! pic.twitter.com/GjJimBIKd3— varu sarathkumar (@varusarath) February 20, 2017