Join us
Daily Top 2Weekly Top 5

प्रसिद्ध अभिनेत्रीने वयाच्या 51 व्या वर्षी दिला मुलाला जन्म, टॉम क्रूझसोबत केलंय काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2024 18:02 IST

पाच वर्षांपूर्वीच तिने अभिनेत्री झाली होती एका गोंडस मुलीची आई.

हॉलिवूड स्टार कॅमेरुन डियाझ (Camerone Diaz) वयाच्या 51 व्या वर्षी आई बनली आहे. तिने आजच एका गोंडस मुलाला जन्म दिला. या वयात बाळाला जन्म दिल्याने अनेकांना साहजिकच आश्चर्य वाटलं आहे. तर तिचे चाहते तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. कॅमेरुनचा पती बेंजीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे. 

कॅमेरुन आणि बेंजी यांनी 2015 मध्ये लग्न केलं. २०१९ मध्ये त्यांना एक मुलगी झाली. तिचं नाव रॅडिक्स असं ठेवण्यात आलं. तर आता ५ वर्षांनी कॅमेरुन पुन्हा आई झाली आहे. तिला मुलगा झाला असून त्याचं नाव कार्डिनल मॅडन असं ठेवलं आहे. लेकाचं स्वागत करत कॅप्शनमध्ये लिहिलं, " आज आम्ही कार्डिनल मॅडनचे आईबाबा झालो. तो खूप छान आहे आणि आम्ही एक हसतं खेळतं कुटुंब आहोत. मुलांच्या प्रायव्हसीसाठी आम्ही फोटो पोस्ट करणार नाही पण तो खरंच खूप क्युट आहे. आम्ही नशिबवान आहोत. आमच्याकडून तुम्हा सर्वांना खूप प्रेम."

कॅमेरुन डियाझने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. 1994 साली 'द मास्क' सिनेमातून तिने पदार्पण केलं. टॉम क्रुझसोबतचा तिचा 'नाईट अँड डे' सिनेमा खूप गाजला. याशिवाय तिने 'द हॉलिडे','चार्लीज एंजल्स','द अदर वुमन' या सिनेमांमध्येही काम केलं. 

टॅग्स :सेलिब्रिटीप्रेग्नंसीपरिवारहॉलिवूड