Join us
Daily Top 2Weekly Top 5

"त्यांच्यावर कारवाई करा नाहीतर.."; आलिया भटचा तीळपापड! इतकी कोणावर रागावली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2024 14:43 IST

आलिया भटने सोशल मीडियावर पोस्ट करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केलीय. नेमकं प्रकरण काय? (alia bhatt)

आलिया भट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री. आलियाने विविध सिनेमांत भूमिका साकारुन प्रेक्षकांच्या मनावर स्वतःची छाप पाडली. आलिया सोशल मीडियावर विविध विषयांवर पोस्ट करत असते. आलियाने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट व्यक्त करुन तिचा राग व्यक्त केलाय. आलियाने सोशल मीडियावर एका महत्वाच्या विषयांवर पोस्ट शेअर करुन अन्यायाला वाचा फोडली आहे.

झालं असं की.. गायिका आणि अभिनेत्री सोफी चौधरीने तिच्या स्टोरीवर एक व्हिडीओ शेअर केलाय. यात एका कुत्र्याला मोलकरीणने बेदम मारहाण केली. हा व्हिडीओ हृदयद्रावक असून मुक्या प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचारावर सोफीने वाचा फोडली आहे. सोफीची स्टोरी शेअर करुन आलिया लिहिते, "तुम्हालाही यापुढे जर पाळीव मुक्या प्राण्यांवर अत्याचार झालेला दिसेल तर असा व्हिडीओ बनवून थेट अधिकाऱ्यांना पाठवा. त्यामुळे त्यांच्यावर योग्य कारवाई होईल."

आलिया भटच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर.. आलियाचा २०२३ मध्ये आलेला 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमातील गाणी, आलियाचा अभिनय अशा सर्व गोष्टींचं खुप कौतुक झालं. आलिया सध्या आगामी 'जिगरा' सिनेमाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. हा सिनेमा २०२५ मध्ये रिलीज होण्यााची शक्यता आहे. आलिया आणि रणबीर कपूर दोघं सध्या चर्चेत आहेत. दोघांची लेक राहा सुद्धा पापाराझींची लाडकी आहे.

 

 

टॅग्स :आलिया भटकुत्रा