Join us
Daily Top 2Weekly Top 5

 सुकून गेलीयेस अगदी...! अभिज्ञाच्या फोटोवर अभिनेत्याची कमेंट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 17:27 IST

अभिज्ञाच्या या फोटोंवरही चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्यात. पण काही कमेंट्सनी मात्र लक्ष वेधून घेतले....

ठळक मुद्देअभिज्ञा ही टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे.

खुलता कळी खुलेना  आणि  तुला पाहते रे  या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अभिज्ञा भावे  (Abhidnya bhave) मालिका आणि तिच्या ग्लॅमरस लूकमुळे   नेहमीच चर्चेत असते. आता तिच्या ताज्या फोटोंची चर्चा रंगलीये. होय, अभिज्ञाने साडीतील काही  फोटो शेअर केले आहेत. या फोटोत अभिज्ञा कमालीची सुंदर दिसतेय. अशा या सुंदर फोटोंवर कमेंट्सचा पाऊस पडणार नाही तर नवल! अभिज्ञाच्या या फोटोंवरही चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्यात. पण काही कमेंट्सनी मात्र लक्ष वेधून घेतले. यातलीच एक कमेंट होती अभिनेता सौरभ गोखलेची.

‘ए सुकून छीनने वालो, मन ही मन अपने लिये सुकून क्यो मांगते हो?’, असं कॅप्शन अभिज्ञाने स्वत:चे फोटो शेअर केलेत. मग काय, अभिज्ञाची मस्करी करण्याची अनावर इच्छा झालेल्या सौरभने तिच्या या कॅप्शनमधील नेमका ‘सुकून’ हा शब्द पकडला. यानंतर काय तर तर याच शब्दावरून त्याने अभिज्ञाची जाम मजा घेतली.  सुकून गेलीयेस अगदी... , अशी कमेंट त्याने केली.

आता यावर अभिज्ञा गप्प कशी बसणार. अरे हलकट माणसा..., असा रिप्लाय तिने दिला. तर अभिनेत्री श्रेया बुगडे हिने सौरभच्या कमेंटवर हसण्याचे इमोजी शेअर केलेत. आता यावरून अभिज्ञा आणि सौरभ दोघेही चांगले मित्र आहेत, हे तुम्हाला कळले असेलच.अभिज्ञा ही टीव्हीवरचा लोकप्रिय चेहरा आहे. मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात अभिज्ञा भावेचा मोठा चाहतावर्ग आहे.  रंग माझा वेगळा  या स्टार प्रवाहवरील मालिकेत ती शेवटची दिसली होती. त्या आधी तिने खुलता कळी खुलेना, लगोरी, प्यार की एक कहानी अशा अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. अभिज्ञा अभिनय क्षेत्रात येण्याआधी एअर हॉस्टेस होती.

टॅग्स :अभिज्ञा भावे