Join us
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावेने 'माझा साखरकारखाना' म्हणतं शेअर केले साखरपुड्याचे सुंदर फोटो

By गीतांजली | Updated: October 25, 2020 17:48 IST

अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे.

मराठी अभिनेत्री अभिज्ञा भावे गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या पर्सनल लाईफला घेऊन चर्चेत आहे. अभिज्ञा भावेचा नुकताच साखरपुडा पार पडला आहे. अभिनेत्रीने स्वत: ही आनंदाची बातमी सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांना फोटो शेअर करत दिली. अभिज्ञाने  'माझा साखरकारखाना' असे कॅप्शन देत साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. मराठी सेलिब्रेटीं आणि चाहत्यांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. कुटुंबीयांच्या उपस्थित अभिज्ञाने साखरपुडा केला आहे.  

रिपोर्टनुसार अभिज्ञा पुढच्या वर्षी लग्नाच्या बेडीत अडकू शकते. अभिज्ञाच्या होणाऱ्या पतीचे नाव मेहूल पै आहे. मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या १२ वर्षांपासून 'क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड'मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे.यातून इव्हेंट मॅनेजमेंट, टाइम मॅनेजमेंट, फायनान्शियल प्लॅनिंगची जबाबदारी तो सांभाळतो आहे.

तुला पाहते रे मालिकेतील मायराच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अभिज्ञा भावे सोशल मीडियावर सक्रीय असते.फार कमी लोकांना माहित आहे की चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी अभिज्ञा एअरहॉस्टेस होती.

२०१४ साली ती वरूण वैटिकर यांच्यासोबत विवाहबद्ध झाली होती. मात्र काही कारणास्तव नंतर ती विभक्त झाली. २०१० साली 'प्यार की ये एक कहाणी' या हिंदी मालिकेतून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. अभिज्ञाच्या मुव्हिंग आऊट या वेबसीरिजला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर नुकताच त्याचा दुसरा सीझनदेखील प्रदर्शित करण्यात आला.

टॅग्स :अभिज्ञा भावे