Join us

अभिनेता उपेंद्र लिमयेने 'सुपर डान्सर चॅप्टर ५'मधील स्पर्धक आदितीला दिला खास पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 19:46 IST

Super Dancer Chapter 5 : 'सुपर डान्सर चॅप्टर ५' शोमध्ये या आठवड्यात मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली.

सुपर डान्सर चॅप्टर ५ शोमध्ये या आठवड्यात मनोरंजनाच्या सुवर्णयुगाला मानाचा मुजरा केला जाणार आहे. या विशेष भागात आदितीने पुन्हा एकदा आपल्या नृत्याने सर्वांची मने जिंकली. आदितीचा प्रवास अधिकच प्रेरणादायी ठरला आहे. कारण या आठवड्यात तिला एक खास मेसेज मिळाला आहे तोही थेट राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि 'जोगवा' चित्रपटासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झालेले मराठी सिनेअभिनेते उपेंद्र लिमये यांच्याकडून.

सातारहून पाठवलेल्या या संदेशात उपेंद्र लिमये म्हणतात, "ही माझी खास शुभेच्छा आहे त्या एकीसाठी.  जिला साताऱ्याने घडवलंय आणि जिला आज संपूर्ण भारत पाहतोय सुपर डान्सरमध्ये. आपल्या साताऱ्याचीच लेक आदिती. कमाल, अप्रतिम, सुंदर! तुझं १००% देणं प्रत्येकवेळी दिसतं. तुला खूप खूप शुभेच्छा. साताराही तुझ्यासोबत आहे, आणि आता संपूर्ण महाराष्ट्रही! ऑल द बेस्ट!"

आपल्या गावाचं नाव उज्वल करणारी आदिती आज महाराष्ट्रभरातील लहानग्यांसाठी प्रेरणास्थान ठरली आहे. उपेंद्र लिमये यांच्या शब्दांनी तिच्या नृत्ययात्रेला नवे बळ मिळाले आहे. हा खास भाग चुकवू नका! सुपर डान्सर चॅप्टर ५ शनिवार आणि रविवार, रात्री ८ वाजता फक्त सोनी एण्टरटेन्मेंट टेलिव्हिजन आणि सोनी लिव्हवर पाहायला मिळेल.

टॅग्स :सुपर डान्सरउपेंद्र लिमये