Join us

अभिनेते सुनील तावडेंची लेक लग्नबंधनात अडकली; धुमधडाक्यात पार पडला सोहळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2023 09:44 IST

अंकिताचे प्रवीण वारसह लग्न झाले असून या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

मराठी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे अभिनेते सुनील तावडे (Sunil Tawade) यांची लेक अंकिता लग्नबंधनात अडकली. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या होणाऱ्या जावयासोबत डान्स करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. अंकिताचे प्रवीण वारसह लग्न झाले असून या सोहळ्यात सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली. लेकीच्या लग्नात अभिनेते सुनील तावडे यांनी देखील ठेका धरला.

अंकीता तावडे (Ankita Tawade) ही देखील सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ती स़्टार प्रवाह वाहिनीत निर्माती म्हणून काम करते. तर सुनील तावडे यांचा मुलगा शुभंकर तावडेही अभिनेता आहे. त्याने नुकतेच रितेश देशमुखच्या 'वेड' सिनेमात भूमिका साकारली.  कालच अंकिताने तिच्या संगीत सोहळ्याचा खास व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. यामध्ये संपूर्ण कुटुंब आनंदाने नाचताना दिसत आहे. अभिनेते सुनील तावडे सुद्धा लेकीच्या लग्नात धम्माल करत आहेत. त्यांनी अगदी थाटात लेकीचे लग्न लावून दिल्याचं दिसून येत आहे.

या लग्नसोहळ्याला संस्कृती बालगुडे, मुग्धा कर्णिक, मानसी नाईक, प्रथमेश परब या कलाकारांनीही हजेरी लावली.अगदी थाटात हा विवाहसोहळा पार पडला. सुनील तावडे गेली अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टीत काम करत आहेत. मराठी मालिका, चित्रपट यामध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचे कौशल्य दाखवले आहे. विनोदी असो किंवा गंभीर अशा सर्वच भूमिका त्यांनी निभावल्या आहेत. सुनील तावडे यांना कुटुंबातूनच अभिनयाची गोडी निर्माण झाली. त्यांचे पणजोबा दादा साळवी हे प्रसिद्ध अभिनेते होते. 

टॅग्स :मराठी अभिनेतापरिवारलग्न