ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. १५ - बॉलिवूड अभिनेता सलमान खान आणि पॉर्न स्टार सनी लिऑन यांना गुगल सर्चवर सर्वाधित जास्त प्रमाणात सर्च करण्यात आले आहे. गेल्या दशकात गुगलने जाहीर केलेल्या यादीत दबंग स्टार सलमान खान बॉलिवूडच्या इतर अभिनेत्यांपैकी टॉपला आहे. तर त्याच्या पाठोपाठ अभिनेता शाहरुख खान, अक्षय कुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या समावेश आहे. तमीळ सुपरस्टार रजनीकांत सुद्दा या यादीत टॉप फाईव्हला आहे. ह्रतिक रोशन, शाहिद कपूर, रणबिर कपूर, अमीर खान आणि इम्रान हाश्मी टॉप टेनमध्ये आहेत. दुसरीकडे गुगलवर बॉलिवूड अभिनेत्रींच्या बाबतीत टॉप सर्चवर सनी लिऑन अव्वल स्थानावर आहे. तिच्या पाठोपाठ कतरिना कैफ, करीना कपूर, काजल अग्रवाल, दीपिका पादुकोण, ऐश्वर्या राय, प्रियांका चोप्रा, तमन्ना भाटिया आणि सोनाक्षी सिन्हा यांचा समावेश आहे. त्याचबरोबर फिल्ममेकर प्रभु देवा याला दिग्दर्शक म्हणून जास्त सर्च करण्यात आले आहे. त्यानंतर करन जोहर, फरहान अख्तर, राज कपूर, राम गोपाल वर्मा, फराह खान आहेत. तर, अभिनेता अमिर खानची भूमिका असलेल्या पीके या चित्रपटाला गेल्या दहा वर्षात जास्त सर्च करण्यात आले आहे. पीके पाठोपाठ कहाणी, बाहुबली, आशिकी २, धूम ३. किक, बजरंगी भाईजान, हॅपी न्यू इअर, हिरो आणि एक व्हिलेन या चित्रपटांचा समावेश आहे. तसेच, क्लासिक अभिनेता म्हणून अमिताभ बच्चन आणि क्लासिक अभिनेत्री म्हणून रेखा यांना जास्त सर्च करण्यात आले आहे. गेल्या काही वर्षभरात धून उडवून देणा-या रॅप्पर हनी सिंगला सुद्धा इतर गायकांच्या तुलनेत जास्त सर्च करण्यात आले आहे. याचबरोबर गायक अतिफ अस्लम, अरजित सिंह, लता मंगेशकर, सोनू निगम, किशोर कुमार, श्रेया घोषाल, हिमेश रेशमिया आणि सुनिधी चौहान यांचा सुद्धा समावेश आहे.