Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेता रितेश देशमुख पोलिसांच्या ताब्यात!

By admin | Updated: April 8, 2017 16:31 IST

बॉलिवूडचा "लई भारी" अभिनेता रितेश देशमुखला पोलिसांना बेड्या ठोकून ताब्यात घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - बॉलिवूडचा "लई भारी" अभिनेता रितेश देशमुखला पोलिसांना बेड्या ठोकून ताब्यात घेतल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. कोणत्या आरोपाखाली रितेशला अटक झाली आहे, हा प्रश्न जर तुम्हाला सतावत असेल तर जरा थांबा. 
 
कारण रितेशला झालेली अटक ही सत्य स्वरुपातील नाही. तर रितेश आपला आगामी सिनेमा "बँक चोर" सिनेमाचं प्रमोशन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचं एक पोस्टरदेखील रिलीज करण्यात आलं होतं. 
 
या दोघांनी सिनेमाचं हटके प्रमोशन करण्याचं ठरवलं. त्यानुसार अगदी एखाद्या ख-या गुन्हेगाराला अटक करतात त्याचप्रमाणे रितेशला पोलीस ताब्यात घेऊन जात आहेत. यशराज फिल्म्सची निर्मिती असलेल्या बँक चोर या  रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि रिया चक्रवर्ती मुख्य भूमिकेत आहेत. सिनेमात रितेश देवावर विश्वास असलेल्या एका मराठी तरुणाच्या भूमिकेत असून, बँकेचे कर्ज न फेडू शकल्याने मित्रांच्या मदतीने बँक लुटण्याची योजना तो बनवतो.
 
दुसरीकडे विवेक ओबेरॉय वर्षभरानंतर सिनेमात दिसणार असून तो एका सीबीआय अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. रितेशने सांगितले की, त्याने लहानपणी स्केच पेन चोरले होते, तसेच शाळेमध्ये मित्रांचा डबा चोरून तो खात असे.
 
विनोदी आणि रोमांचक कथा असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन बम्पी यांनी केले आहे. हा सिनेमा 16 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.  रितेश देशमुखच्या 2016 मध्ये ‘हाऊसफुल्ल 3’ , ग्रेट ग्रॅण्ड मस्ती आणि बॅन्जो या सिनेमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. आगामी ‘बँक चोर’ या सिनेमानंतर तो ‘माऊली’ या मराठी सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.