ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. 01 - अभिनेते रझाक खान यांचं निधन झालं आहे. आज सकाळी होली फॅमिली रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मंगळवारी त्यांना ह्रद्यविकाराचा झटका आला होता त्यानंतर त्यांना रुग्णलयात भर्ती करण्यात आलं होतं. हॅलो ब्रदर, हंगामा आणि हेरा फेरी चित्रपटांमधील त्यांच्या विनोदी भुमिका गाजल्या होत्या.
रझाक खान यांच्यावर गुरुवारी दुपारी 4 वाजता भायखळामधील स्मशाभुमीत दफन करण्यात येणार आहे. रझाक यांचा मुलगा असद परदेशात असल्याने तो आल्यानंतरच अंत्यविधी करण्यात येईल अशी माहिती कुटुंबियांनी दिली आहे.
रझाक खान यांनी 40हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. यामध्ये हॅलो ब्रदर, हंगामा, हेरा फेरी, रुप की रानी, राजा हिंदुस्तानी, क्या सुपर कूल है हम, अॅक्शन जॅक्शन सारख्या चित्रपटांचा समावेश आहे.