Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मी आधी त्यांना खूप मानायचो पण...' रणवीर शौरीने केला महेश भट्ट यांच्याबद्दल खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2024 17:43 IST

रणवीर शौरीने बॉलिवूडमधील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला

हिंदी सिनेमातील प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक महेश भट यांच्याविषयी नेहमीच काही ना काही चर्चा असते. नुकतंच 'टायगर' फेम अभिनेता रणवीर शौरीने (Ranvir Shorey) महेश भट (Mahesh Bhat) यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं. रणवीर शौरी आणि महेश भट  यांची मुलगी पूजा भट रिलेशनशिपमध्ये होते. २००३ मध्ये 'जिस्म'च्या सेटवर दोघांची भेट झाली होती. मात्र काही काळाने त्यांचं नातं तुटलं. तेव्हा दोघांनी एकमेकांवर अनेक आरोप लावले. आता नुकतंच रणवीर शौरीने महेश भट्ट यांच्याविषयी केलेलं वक्तव्य चर्चेत आहे.

रणवीर शौरी म्हणाला, "जेव्हा मी त्यांच्या मुलीसोबत होतो, तेव्हा मी त्यांना खूप मानायचो. पण जेव्हा आमच्यात प्रॉब्लेम सुरु झाले तेव्हा माझ्या मनात त्यांच्यासाठी जो आदर होता त्याचा वापर त्यांनी मोठ्या हुशारीने माझ्याच विरोधात करायला सुरुवात केली. मला खूपच दुय्यम वागणूक दिली जात होती. मला इंडस्ट्रीतूनही वाईट वागणूक मिळत होती."

तो पुढे म्हणाला, "काही वर्षांनंतर जेव्हा सुशांत सिंह राजपूतसोबत असं झालं तेव्हा मला वाटलं की आता बोललं पाहिजे. तुम्ही इंडस्ट्रीत कोणालाही विचारा तुम्हाला ऑफ रेकॉर्ड सगळेच हे खरं आहे असंच सांगतील. इंडस्ट्रीत एखाद्याविरोधात अशाप्रकारे गँगिंग केली जाते पण मी हे ऑन रेकॉर्ड बोलू शकतो. मला हे सांगण्यात काहीच प्रॉब्लेम नाही. इथे एकाविरोधात गँगबाजी होते आणि दुसऱ्याचं करिअर खराब केलं जातं. इथे हे सगळं होत असतं."

रणवीर शौरी 'सोनचिरिया' शूटिंगवेळी सुशांतसिंह राजपूतसोबत दोन महिने होता. त्यांच्यात खूप छान मैत्री झाली होती. रणवीर शौरीने 'जिस्म','लक्ष्य','खोसला का घोसला','ट्रॅफिक सिग्नल' आणि 'भेजा फ्राय' सारख्या सिनेमांमध्ये काम केलं आहे.

टॅग्स :रणवीर शौरीमहेश भटबॉलिवूड