Join us
Daily Top 2Weekly Top 5

'काम हवं असेल तर एक रात्र...', मैत्रिणीला कास्टिंग डायरेक्टरचे मेसेज, अभिनेत्याने शेअर केले चॅट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2024 11:29 IST

अभिनेत्याने नाव अन् नंबरही केला उघड

मनोरंजनसृष्टीत कास्टिंग काऊच हा प्रकार सर्रास होतो. काम देण्यासाठी कलाकारांकडे शरीरसुखाची मागणी केली जाते. अशा घटनांमुळे इंडस्ट्रीचं नाव खराब होतं. काही कलाकार याविरोधात आवाज उठवतात तर काही मग गिळून गप बसतात. 'पंड्या स्टोर' फेम अभिनेता मोहित परमारने (Mohit Parmar) नुकतंच कास्टिंग काऊचचा पर्दाफाश केला. त्याच्या अभिनेत्री मैत्रिणीला एका कास्टिंग डायरेक्टरने कॉम्प्रमाईज करण्याची मागणी केल्याचे स्क्रीनशॉटच त्याने थेट पोस्ट केलेत. 

मोहित परमारने शेअर केलेले व्हॉट्सअॅप चॅट अतिशय धक्कादायक आहेत. हे मेसेज कास्टिंग डायरेक्टरने अभिनेत्री प्रेरणा ठाकूरला पाठवले जी त्याची मैत्रीण आहे. यात तो कास्टिंग डायरेक्टर स्कायलाईन स्प्री प्रोडक्शनमधून असल्याचं सांगतो आणि नावही सांगतो. जर भूमिका हवी असेल तर कॉम्प्रमाईज कर असं तो प्रेरणाला सांगतो. हे चॅट शेअर करत मोहित लिहितो,'अशा लोकांपासून सावध राहा. हा कास्टिंग कोऑर्डिनेटर महिला कलाकारांसोबत गैरवर्तन करतो आणि त्यांचं शोषण करतो. हा तिला एका रात्रीसाठी बोलवत आहे. जर हा माणूस तुम्हाला कामासाठी संपर्क करेल किंवा कोणत्या ऑडिशन ग्रुपमध्ये दिसला तर त्याला सरळ ब्लॉक करा. रिपोर्ट करा किंवा तक्रार करा. याचं नाव प्रेम मल्होत्रा आहे.'

दरम्यान गेल्या काही दिवसात अनेक अभिनेत्रींनी त्यांना आलेले धक्कादायक अनुभव शेअर केले.  फक्त अभिनेत्रींनाच नाही तर अभिनेत्यांनाही असे अनुभव आले आहेत. आयुष्मान खुराना, शिव ठाकरे या कलाकरांनी त्यांचे अनुभव सांगितले होते. कास्टिंग काऊच हा इंडस्ट्रीला लागलेला काळा डाग आहे.

टॅग्स :कास्टिंग काऊचटिव्ही कलाकारसोशल मीडिया