Join us

अभिनेत्री हुमा कुरेशी हॉलिवूडमध्ये दिसणार?

By admin | Updated: April 25, 2016 18:54 IST

अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री हॉलिवूडमध्ये झळकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २५ -  अभिनेत्री प्रियंका चोप्रा, दीपिका पदुकोण यांच्यानंतर आता बॉलिवूडमधील आणखी एक अभिनेत्री हॉलिवूडमध्ये झळकण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे,
पिंकव्हिलाच्या रिपोर्टनुसार, गँग्ज ऑफ वासेपूर, बदलापूर यासारख्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची उत्तम कामगिरी करणारी अभिनेत्री हुमा कुरेशी हॉलिवूडपटात दिसण्याची शक्यता आहे.
हॉलिवूडच्या ‘द ममी ४’ या चित्रपटामधील भूमिकेसाठी अभिनेत्री हुमा कुरेशीने ऑडिशन दिले असून यामध्ये ती पात्र झाल्यास हॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूझ आणि सोफिया बौतेल्ला यांच्यासोबत दिसणार आहे. दरम्यान, याबाबतच्या वृत्ताला अभिनेत्री हुमा कुरेशीच्या प्रवक्तांनी दुजोरा दिला आहे.