Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिनेते गिरीश ओक यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, झळकणार या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2023 16:13 IST

ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) शेवटचे 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेत पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर होते. त्यानंतर आता ते छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहेत.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते गिरीश ओक (Girish Oak) यांनी विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे. शेवटचे ते अग्गंबाई सूनबाई मालिकेत पाहायला मिळाले होते. त्यानंतर ते बराच काळ छोट्या पडद्यापासून दूर होते. त्यानंतर आता ते छोट्या पडद्यावर कमबॅक करत आहे. ते सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत पाहायला मिळणार आहेत. 

सुख म्हणजे नक्की काय असतं मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. या मालिकेचं कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले असून गौरी-जयदीच्या पुनर्जन्माची उत्कंठावर्धक गोष्ट नित्या आणि अधिराजच्या रुपात पाहायला मिळणार आहे. आता मालिकेत जयदीपचा अधिराज तर गौरीचा नित्या म्हणून पुनर्जन्म झालेला आहे. अधिराज हा रांगड्या शेतकऱ्याच्या रुपात तर गावंढळ गौरी सुशिक्षित नित्याच्या रुपात पाहायला मिळत आहे. या मालिकेत गिरीश ओक नित्याच्या वडीलांच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. त्यांचे चाहते त्यांना छोट्या पडद्यावर पुन्हा पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

गिरीश ओक यांच्या व्यतिरिक्त प्रसिद्ध अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांची सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत धमाकेदार एण्ट्री झाली आहे. हर्षदा खानविलकर मालिकेत सरपंचाच्या भूमिकेत दिसतील. सौ. वसुंधरादेवी अहिरराव असं त्यांच्या भूमिकेचं नाव असून आतापर्यंत त्यांनी साकारलेल्या भूमिकांपेक्षा वेगळी आणि हटके अशी ही भूमिका आहे  

टॅग्स :गिरिश ओक