Join us

अभिनेता अमेय वाघ आणि साजिरी अडकले लग्नाच्या बेडीत

By admin | Updated: July 2, 2017 16:41 IST

मुरांबा या चित्रपटातून आणि दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून झळकलेला अभिनेता अमेय वाघ आज म्हणजेच 2 जुलै रोजी लग्नाच्या बेडीत अडकला

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 2 - मुरांबा या चित्रपटातून आणि दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतून झळकलेला अभिनेता अमेय वाघ आज म्हणजेच 2 जुलै रोजी लग्नाच्या बेडीत अडकला आहे. गेल्या 13 वर्षांपासून असलेली बालमैत्रिणी साजिरी देशपांडेशी त्यानं लग्न केलं आहे. काही दिवसांपूर्वीच आपण लवकरच लग्नबंधनात अडकणार असल्याची माहिती त्यानं इन्स्टाग्रामसारख्या सोशल साइटवरून दिली होती. साजिरी माझी खूप चांगली मैत्रीण असून, गेल्या 13 वर्षांपासून ती हे नाते चांगल्या पद्धतीनं हाताळते आहे. म्हणूनच मी तिच्याशी लग्न करणार असल्याचं अमेयनं सांगितलं होतं. रविवारच्या मुहूर्तावर अखेर अमेय आणि साजिरीनं लग्न केलं आहे.तत्पूर्वी अमेयने साजिरीसोबतचा इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करून आपल्या नव्या इनिंगची सुरुवात होण्यास आता केवळ 12 दिवस राहिले असल्याचं सांगितलं होतं. अमेयच्या या पोस्टनंतर त्याच्यावर शुभेच्छांचाही वर्षाव झाला होता. अखेर तो लग्नाच्या बेडीत अडकला आहे.

अमेय वाघ सोबत लग्न करणारी त्याची बालमैत्रीण साजिरी देशपांडे मुंबईतमध्ये Colgate Global Business Services Private Ltd या कंपनीमध्ये काम करत आहे.

(अमेयच्या प्रेमाचा "मुरांबा" मुरला, लवकरच अडकणार विवाहबंधनात)

मुरांबा चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारी मिथिला पालकर हिच्यासोबत याआधी अमेयचं नाव जोडलं गेलं होतं. दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या पुढे आल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी तेव्हा ते नाकारत आमची फक्त मैत्री असल्याचं स्पष्ट केलं होतं.