Join us
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवर कॅटरिनाही झाली अ‍ॅक्टिव्ह!

By admin | Updated: April 29, 2017 01:12 IST

सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला जणू काही सोशल मीडियाचा लळा लागला आहे. नुकतेच फेसबुकवरून तिने नवे घर घेतल्याचा आनंद तिच्या फॅन्सबरोबर शेअर केला होता.

सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ हिला जणू काही सोशल मीडियाचा लळा लागला आहे. नुकतेच फेसबुकवरून तिने नवे घर घेतल्याचा आनंद तिच्या फॅन्सबरोबर शेअर केला होता. आता कॅटरिना इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह झाली असून फॅन्सबरोबर कनेक्ट होण्यास ती खूपच उत्साहित असल्याचे दिसून येत आहे. फॅन्सशी कनेक्ट राहण्यासाठी कॅटरिनाने २६ एप्रिलला इन्स्टाग्राम अकाउंट क्रिएट केले. लगेचच तिने २७ एप्रिल रोजी तिचा एक फोटोही अकाऊंटवर पोस्ट केला. हा फोटो पोस्ट करताना कॅटरिनाने लिहिले की, ‘नवी सुरुवात... माझ्या हॅप्पी प्लेसमधून... हॅलो इन्स्टाग्राम!’ कॅटरिनाच्या या पोस्टला हजारोंच्या संख्येने लाइक्स मिळत असून, दोनच दिवसांत तिच्या फॉलोअर्सची संख्या साडेसहा हजारांच्यावर पोहोचली आहे. कॅटरिना आता इन्स्टाग्रामवर झळकणार याचा तिच्या फॅन्सना प्रचंड आनंद झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. कारण तिने फोटो शेअर करताच आतापर्यंत १,५९,५८१ यूजर्सनी तिच्या फोटोला लाईक्स केले आहे. शिवाय फोटोला कमेंट देताना अनेकांनी तिचे वेलकमही केले आहे.