Join us

आॅफ बिट जोड्यांनीही मिळवले यश

By admin | Updated: December 6, 2015 03:01 IST

बॉलिवूडमध्ये या दिवसांत आॅफ बिट जोड्यांच्या गोष्टी जास्त ऐकायला मिळत आहेत. आॅफ बिट जोडीचा साधा अर्थ म्हणजे कमर्शियल आणि नॉन कमर्शियल सिनेमाच्या कलाकारांची जोडी.

बॉलिवूडमध्ये या दिवसांत आॅफ बिट जोड्यांच्या गोष्टी जास्त ऐकायला मिळत आहेत. आॅफ बिट जोडीचा साधा अर्थ म्हणजे कमर्शियल आणि नॉन कमर्शियल सिनेमाच्या कलाकारांची जोडी. उदाहरणार्थ आताच प्रदर्शित झालेल्या संजय गुप्ताच्या ‘जज्बा’ या चित्रपटात इरफानसोबत ऐश्वर्या रायच्या जोडीला आॅफ बिट जोडी मानले गेले. याअगोदर ‘पीकू’मध्ये जेव्हा इरफानची जोडी दीपिका पदुकोणच्या सोबत बनविली, तर या जोडीलादेखील आॅफ बिट जोडीच्या यादीत गणले गेले. ही यादी तशी मोठी आहे. या यादीत रणबीर कपूरदेखील आहे. ज्याने करण जोहरच्या कंपनीतला चित्रपट ‘वेकअप सिड’साठी कोंकणा सेन शर्मासोबत जोडी बनविली होती. या जोडीला दर्र्शकांनी खूप पसंत केले होते. या यादीत विश्व चॅम्पियन मेरी कॉमच्या जीवनावर आधारित प्रियंका चोपडाचा चित्रपट ‘मेरी कॉम’पण आहेच. ज्यात प्रियंकासोबत दर्शन कुमार होता. लारा दत्ता निर्मित चित्रपट ‘चलो दिल्ली’मध्ये लारासोबत विनय पाठक मुख्य भूमिकेत होता. रवीना टंडनचे करिअर आणखी वेगाने धावायला लागले जेव्हा तिने मनोज वाजपेयीसोबत ‘शूल’ चित्रपटात काम केले. याअगोदर त्यांची जोडी नॉन कमर्शियल कलाकार म्हणून गणली जायची. ‘चमेली’ला करिना कपूरच्या क ॅरिअरमधील सर्वांत चांगला सिनेमा मानला गेला. यात करिनाचा जोडीदार राहुल बोस होता. या क्रमात विद्या बालनचे नाव घेणे आवश्यक आहे. तिने इश्किया आणि डर्टी पिक्चरमध्ये नसीरुद्दीन शाहसोबत जोडी बनविली आणि दोन्ही चित्रपटांना बॉक्स आॅफिसवर मोठे यश मिळाले. याबरोबरच सुपर स्टार अमिताभ बच्चनसोबत स्मिता पाटीलची जोडी पहिल्यांदा प्रकाश मेहराने ‘नमक हलाल’मध्ये बनविली. ही जोडी रमेश सिप्पीच्या ‘शक्ती’मध्येपण दिसली. शबाना आजमीसोबत अमिताभ बच्चन ‘मैं आजाद हूं’मध्ये दिसले. स्मिता पाटीलने राजेश खन्नासोबत ‘आखिर क्यों?’ आणि विनोद खन्नासोबत ‘अमर अकबर अँथोनी’ आणि ‘परवरिश’मध्ये काम केले.

- anuj.alankar@lokmat.com