Join us
Daily Top 2Weekly Top 5

'अबीर गुलाल' फेम अभिनेत्रीचं चाहत्यांना भावुक पत्र; पोस्ट शेअर करत म्हणते- "तुमची लाडकी श्री..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 15:32 IST

'अबीर गुलाल' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत दिला दुजोरा.

Abir Gulal Serial: गेल्या काही दिवसांपासून छोट्या पडद्यावर नव्या मालिकांची नांदी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे. टीआरपीच्या अभावी अगदी पाच ते सहा महिन्यांपूर्वीच सुरू झालेल्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. अलिकडेच कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' ही मालिका नव्या मालिका येत असताना प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची चर्चा होती. या मालिकेत अभिनेता अक्षय केळकर, पायल जाधव, गायत्री दातार प्रमुख भूमिकेत पाहयला मिळाले. मालिका बंद होणं हा जसा चाहत्यांसाठी धक्का होता तसाच तो कलाकारांसाठीदेखील होता. दरम्यान अशातच सोशल मीडियावर 'अबीर गुलाल' मधील अभिनेत्री पायल जाधवने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. 

कलर्स मराठी वाहिनीवरील 'अबीर गुलाल' या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. या मालिकेमध्ये अभिनेत्री पायल जाधवने श्री नावाचं पात्र साकारलं होतं. दरम्यान,नुकतीच पायलने तिच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्रीने लिहलंय, "तमाम मराठी रसिक प्रेक्षकांना सप्रेम नमस्कार! पत्रास कारण की, तुमची लाडकी श्री तुमचा निरोप घेत आहे. आपण 'अबीर गुलाल' मालिकेला आणि सर्व पात्रांना भरभरून प्रेम दिलं. आपल्या सर्वांचे  मनापासून आभार!  माझ्यावर विश्वास ठेवून संधी दिल्याबद्दल  कलर्स मराठीचे आणि पोर लायन्स, फिल्म फार्म या निर्मिती संस्थांचे  आभार. सातत्याने अथक मेहनत करून रोज नवीन भाग आपल्यापर्यंत पोहोचवणााऱ्या कलाकार, तंत्रज्ञ आणि मदतनीसांचे आभार."

पुढे तिने लिहलंय, "साकारेलली प्रत्येक भूमिका काहीना काही देऊन जाते. बहुतांशी मालिकेत सत्याचा असत्यावर विजय होतो. मात्र, त्या पलीकडे जाऊन श्रीने आपल्या न्यूनगंडाला  थेट फाट्यावर मारायला शिकवलं. आपली माणसं जपण्यासाठी ४ पावले मागे येणारी,  प्रसंगी ठामपणे  उभी राहिलेली श्री तुम्हाला आवडली याचा मला फार आनंद आहे."

"मराठी मालिकांवर, कलाकृतींवर आपण भरभरुन प्रेम कराल  याची मला खात्री आहे.  परत भेटूच. तोपर्यंत थांबायचं नाही, आणि एक  गोष्ट लक्षात ठेवायची- हाय अंबाबाईची साथ तर कशाला उद्याची बात तुमची लाडकी श्री म्हणजेच पायल असं पत्र अभिनेत्रीने लिंहलं आहे." अशी भावुक पोस्ट अभिनेत्री सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया