Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेकने घेतलाच सुनीलचा बदला!

By admin | Updated: May 15, 2016 00:59 IST

मागील आठवड्यात ऐश्वर्या रॉय बच्चन जेव्हा ‘सरबजीत’ च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोवर आली होती तेव्हा सुनील ग्रोव्हर म्हणजेच डॉ.मशूर गुलाटीने ऐशसोबत खुप फ्लर्टिंग केली

मागील आठवड्यात ऐश्वर्या रॉय बच्चन जेव्हा ‘सरबजीत’ च्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोवर आली होती तेव्हा सुनील ग्रोव्हर म्हणजेच डॉ.मशूर गुलाटीने ऐशसोबत खुप फ्लर्टिंग केली. तेव्हाच अभिषेक बच्चनने ठरवले की, पत्नी ऐशची सुनीलने फ्लर्टिंग केली म्हणून आपण आता त्याला तसे सोडायचे नाही. त्याचा बदला घेतल्याशिवाय शांत बसायचे नाही. म्हणून तो नुकताच ‘हाऊसफुल्ल ३’ च्या प्रमोशनसाठी कपिलच्या शोवर गेला होता. अभिषेक बच्चन, अक्षय कुमार आणि रितेश देशमुख हे तिघेही तरूणींच्या रूपात तिथे गेले आणि मग काय सुनील ग्रोव्हर देखील तीन सुंदर तरूणींना पाहून परेशान झाला. त्याची अभिषेकने खुप फ्लर्टिंग केली आणि नंतर त्याला सांगितले की, तो अभिषेक आहे. आणि मग मात्र, अभिषेकच्या जीवाला थोडंतरी बरं वाटलं.