आराध्याची चाहूल लागल्यापासून ऐश्वर्याने काही वर्षं चित्रपटांतून ब्रेक घेतला होता. तिच्या पुनरागनाविषयी अनेक चर्चा सुरू होत्या. तिने चित्रपटात पुन्हा काम करण्यास जया बच्चन यांचा आक्षेप असल्याच्या वावड्या मीडियात उठल्या होत्या. पण आता ऐश्वर्या संजय गुप्ता यांच्या ‘जजबा’ चित्रपटात काम करणार आहे. एकीकडे सासू रुसल्याची चर्चा असताना नवरा अभिषेक मात्र तिचा अभिनय पाहण्यासाठी उत्सुक आहे. नाहीतरी अभिषेकला बायकोचे कौतुक करण्यासाठी सध्या बराच वेळ मिळतोय.
ऐश्वर्याच्या कमबॅकसाठी अभिषेक उत्सुक
By admin | Updated: January 12, 2015 01:08 IST