Join us

अभिषेकने नाकारली १० कोटींची आॅफर

By admin | Updated: November 24, 2014 02:37 IST

हॅप्पी न्यू ईअर’मधील अभिषेक बच्चनने निभावलेली नंदू भिडे या दारुड्याची भूमिका अनेकांना आवडली

‘हॅप्पी न्यू ईअर’मधील अभिषेक बच्चनने निभावलेली नंदू भिडे या दारुड्याची भूमिका अनेकांना आवडली; पण या भूमिकेमुळे अभिषेकला एका अल्कोहोल ब्रँडने प्रचारासाठी दहा कोटींची आॅफर दिली. एवढी रक्कम मिळाल्यानंतरही अभिषेक या जाहिरातीसाठी तयार झाला नाही. अल्कोहोल ब्रँडची जाहिरात करून तरुणांपर्यंत चुकीचा संदेश पोहोचवण्याची अभिषेकची इच्छा नाही. अभिषेकनेही या बातमीला दुजोरा दिला आहे. तो म्हणाला, ‘मला चुकीच्या माध्यमातून पैसा कमवायचा नाही. कोणत्याही ब्रँडचा प्रचार करण्यापूर्वी माझा त्यावर विश्वास असायला हवा.’