Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसांत...’, अभिज्ञा भावेनं शेअर केला पतीसोबत खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 17:03 IST

Abhidnya Bhave : अभिज्ञाचा पती मेहुल सध्या कॅन्सरशी लढतोय. पण अभिज्ञा नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे.

मराठमोळी अभिनेत्री अभिज्ञा भावे  (Abhidnya Bhave)  मराठी इंडस्ट्रीतील एक लोकप्रिय अभिनेत्री. अनेक मालिकांमध्ये अभिज्ञाने नकारात्मक भूमिका साकारल्या. पण खऱ्या आयुष्यात अभिज्ञा मात्र कमालीची सकारात्मक  आहे. अभिज्ञाचा पती मेहुल (Mehul Pai) सध्या कॅन्सरशी लढतोय. पण अभिज्ञा नवऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. नुसती उभी नाही तर त्याला कॅन्सरसारख्या आजाराशी लढण्याची हिंमत देतेय.अभिज्ञानं शेअर केलेला ताजा व्हिडीओ पाहून तुम्हीही तिचं कौतुक कराल. यात ती मेहुलसोबत दिसतेय. यामध्ये अभिज्ञा एका ट्रेंडवर पती मेहुलसोबत धम्माल करताना दिसत आहे.  मेहुलची ट्रीटमेंट सुरु आहे. पण अभिज्ञा त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम ठेवण्यासाठी झटतेय.  व्हिडीओमध्ये अभिज्ञा व मेहुल दोघांच्याही चेहऱ्यावर हसू आहे.  आम्ही आमच्या थेरपीच्या दिवसांत असेच वागतो..., असं तिने हा व्हिडीओ शेअर करताना तिने लिहिलं आहे.

त्यांच्या या व्हिडीओवर चाहत्यांसोबत मराठीतील अनेक सेलिब्रिटींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिज्ञाची जवळची मैत्रिण मयुरी देशमुख हिने हा व्हिडीओ पाहून या कपलचं कौतुक केलं आहे. तुम्ही दोघंही भन्नाट आहात. मला तुम्हा दोघांचा अभिमान वाटतो, अशी कमेंट तिने केली आहे. अनेकांनी मेहुल या आजारातून लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केल्या आहेत.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान 6 जानेवारी 2021 रोजी अभिज्ञा व मेहुल दोघंही लग्नबंधनात अडकले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी मेहुलला कोरोनाची लागण झाली होती. त्यातून तो बरा देखील झाला होता. पण आता त्याला कॅन्सरनं गाठलं आहे.अभिज्ञा आणि मेहुल एकाच कॉलेजमध्ये शिकत होते.  मात्र कॉलेजनंतर त्यांचा संपर्क तुटला होता. अचानक हे दोघे पुन्हा एकमेकांच्या संपर्कात आले. त्यांच्यातली मैत्री पुन्हा फुलत गेली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झाले.

अभिज्ञाप्रमाणे मेहुलचा देखील घटस्फोट झाला असल्यानं दोघांनीही लग्नाचा निर्णय घेतला.  अभिज्ञा भावे आणि मेहुल पै यांच्या लग्नाची सोशल मीडियावर खूप चर्चा रंगली होती.  अभिज्ञाचा पती मेहुल पै मुळचा मुंबईचा असून गेल्या 12 वर्षांपासून  क्लॉकवर्क्स इव्हेंटस प्रायव्हेट लिमिटेड मध्ये तो ऑपरेशन्स मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ‘खुलता कळी खुलेना’ आणि ‘तुला पाहते रे’ या मालिकांमधून घराघरांत पोहोचली. 

टॅग्स :अभिज्ञा भावेटेलिव्हिजनटिव्ही कलाकार