Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबे... ये कौन?

By admin | Updated: April 25, 2016 03:19 IST

तुमच्याच काय, पण हा डायलॉग तर सर्वांच्या लक्षात असणार हे नक्की. या डायलॉगने मध्यंतरी धुमाकूळ घातला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा डायलॉग सर्वांच्या ओठी बाहेर पडत होता

तुमच्याच काय, पण हा डायलॉग तर सर्वांच्या लक्षात असणार हे नक्की. या डायलॉगने मध्यंतरी धुमाकूळ घातला होता. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत हा डायलॉग सर्वांच्या ओठी बाहेर पडत होता. तुमच्यासाठी काय पण... आज पण... उद्यापण हे मेसेजदेखील सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून फिरत होते. या डायलॉगइतकाच हा डायलॉग म्हणणारा संग्राम साळवीदेखील तितकाच लोकप्रिय झाला. त्याची स्टाईलदेखील तितकीच चर्चेत होती. हाच संग्राम आता ‘सरस्वती’ या मालिकेत सध्या झळकत आहे. तो ‘देवयानी’ या मालिकेतून त्याच्या या डायलॉगसहित महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला होता. त्याची ही ओळख अजूनही याच डायलॉगनेच आहे. हाच संग्राम बिनधास्तपणासाठी जरी ओळखला जात असला, तरी त्याच्या या क्लिकमधून तो स्वत:लाच आरशात पाहिल्यावर ‘अबे... ये कौन’ असेच काही हावभाव त्याच्या चेहऱ्यावर दिसत आहेत.