Join us
Daily Top 2Weekly Top 5

"हे 'नेते' आहेत आणि ही आपली लायकी" मनोज तिवारींचा 'तो' व्हिडीओ अभिनेत्यानं केला शेअर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 15:49 IST

मराठी अभिनेत्यानं राजकीय नेत्यांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत.

मराठी सिनेसृष्टीतील स्पष्टवक्ता अभिनेता म्हणून ओळखला जाणारा आस्ताद काळे पुन्हा एकदा आपल्या एका रोखठोक पोस्टमुळे चर्चेत आला आहे. भाजप खासदार आणि भोजपुरी गायक मनोज तिवारी यांचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आस्तादने  राजकीय नेत्यांच्या मानसिकतेवर ताशेरे ओढले आहेत.

 आस्ताद काळेने सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर संताप व्यक्त केला आहे. त्याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं, "हे 'नेते' आहेत आणि ही आपली लायकी आहे. 'नोटाबंदी' नावाचा राष्ट्रीय पीआर स्टंट सपशेल फसलाच होता. त्यात हे लोक भिऊन रांगा लावून उभ्या असलेल्या नागरिकांबद्दल अशी भाष्य करत होते".

तर व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहलंय, "नोटाबंदीच्या काळात एटीएमच्या रांगेत उभे असताना अनेक लोकांचा जीव गेला. अधिकृत आकडेवारीनुसार मृतांचा आकडा शंभराहून अधिक होता. याच संदर्भात भाजप खासदार मनोज तिवारी यांनी कथितपणे त्यांची खिल्ली उडवत, "राष्ट्रवाद विकला तर हे मूर्ख काहीही करतील" अशी टिप्पणी करताना दिसलेत. यातून भाजपच्या दृष्टीने सामान्य माणसाची काय किंमत आहे, ते दिसून येतंय".

मनोज तिवारी यांचा हा व्हिडीओ नोटाबंदीच्या काळातील एका खाजगी कार्यक्रमातील असल्याचं समजतं. यामध्ये तिवारी इतर भाजप नेत्यांसोबत गप्पा मारताना दिसत आहेत. व्हिडीओमध्ये ते सांगत आहेत की, "नोटाबंदीच्या काळात एटीएमच्या रांगेत उभ्या असलेल्या वैतागलेल्या लोकांना शांत करण्यासाठी "तुम्ही देशासाठी हे कष्ट सोसत आहात, तुम्ही खरे देशभक्त आहात" असं मी म्हटलं. यावर रांगेतील लोक हसले आणि त्यांनी टाळ्या वाजवल्या", असं तिवारी उपरोधिकपणे सांगताना दिसत आहेत. यावर भाजपचे इतर नेते हसताना दिसतात.

English
हिंदी सारांश
Web Title : Aastad Kale Shares Manoj Tiwari's Video, Criticizes Leaders' Mentality

Web Summary : Actor Aastad Kale shared a video of BJP MP Manoj Tiwari criticizing citizens during demonetization. Kale condemns the leaders' mindset, highlighting Tiwari's dismissive comments about people suffering in queues and questioning the BJP's value of the common man.
टॅग्स :मराठी अभिनेतानिश्चलनीकरण