Join us  

अभिनेता आशुतोष गोखलेची अनघासह डान्स केमिस्ट्री पाहून फॅन्स झाले क्रेझी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2021 6:04 PM

Aashutosh Gokhale With Anaghaa Atul Dancing Video: आशुतोष गोखले आणि अनघा अतुलच्या डान्सिंगवर चांगलेच फिदा झाल्याचे पाहायला मिळत  आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या  फॅन्सना प्रचंड आवडला आहे.  

आशुतोष आणि अनघा अतुल नेहमीच सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असतात. त्यामुळे सोशल मीडियावर  मोठ्या संख्येने त्यांचे चाहते त्यांना फॉलो करतात.  सोशल मीडियावर त्यांची प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात चाहत्यांनाही रस असतो. त्यामुळे शूटिंगमधून वेळ मिळताच त्यांच्या खासगी आयुष्यात प्रत्येक घडामोडी चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते.

 

दोघांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकुळ घालत आहे. हा कोणता कॉमेडी व्हिडीओ नसून डान्स व्हिडीओ आहे. एरव्ही कधी या दोघांचा अशा प्रकारे डान्स तुम्ही पाहिला नसेल.त्यांच्यासाठी हा व्हिडीओ नक्कीच खास ठरेल. सोशल मीडियावरील डान्सच्या व्हिडीओला लाखांहून अधिक नेटिझन्सनी पाहिला आहे. 

आशुतोष आणि अनघा दोघेही फुल ऑन गाण्यावर बेधुंद होऊन थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. दोघेही एकमेकांना कडवी टक्कर देत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहत्यांसाठी कोणाची डान्सिंग स्कील सर्वात चांगली हे ठरवणेही कठीणच. डान्स करताना आशुतोष आणि अनधा  यां दोघांची ऊर्जा पाहून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल.  डान्स करताना दोघांचीही एनर्जी पाहून त्यांच्या अभिनयाप्रमाणेच डान्सिंग स्कीलचेही चाहते कौतुक करताना दिसत आहे. या दोघांचा डान्सचा व्हिडीओ सध्या फॅन्समध्ये चर्चेचा विषय ठरला आहे. त्यामुळे फॅन्स आशुतोष आणि अनघाच्या डान्सिंगवर चांगलेच फिदा झाल्याचे पाहायला मिळत  आहेत. हा व्हिडीओ त्यांच्या  फॅन्सना प्रचंड आवडला आहे.      

कोरोनाकाळात आशुतोष गोखलेने अनेकांना मदतीचा हात देत त्यांची मदत केली होती. 'खाना चाहिए' या संस्थेशी आशुतोष जोडला गेला आहे. ही संस्था मुंबईतील बेघर आणि गरजूंना मोफत जेवण पोहोचवण्याचं काम करते. संस्थेमार्फत दररोज जवळपास ७५ हजारांहून अधिक जेवणाचे पॅकेट्स वाटप केले जातात. आशुतोष प्रमाणे इतर मराठी कलाकार मंडळी करोना विरुद्धच्या युद्धात मदतीसाठी पुढे आले आहेत.

टॅग्स :आशुतोष गोखले