Join us

आमिरच्या भोजपुरी बोलण्यामागचे रहस्य

By admin | Updated: July 29, 2014 23:14 IST

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर सध्या भोजपुरी भाषेचा रंग चढला आहे. त्याला ही भाषा एवढी आवडली आहे की, तो त्याच्या ओळखीच्यांशीही याच भाषेत बोलताना दिसतो.

मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानवर सध्या भोजपुरी भाषेचा रंग चढला आहे. त्याला ही भाषा एवढी आवडली आहे की, तो त्याच्या ओळखीच्यांशीही याच भाषेत बोलताना दिसतो. ‘पीके’ या आगामी चित्रपटात आमिर एका दारूडय़ाच्या भूमिकेत असून त्याची भाषा भोजपुरी आहे. या भूमिकेसाठी आमिरला भोजपुरी भाषा शिकावी लागली. त्यावेळी भूमिकेसाठी आवश्यक तेवढीच भाषा तो शिकला; पण ही भूमिका साकारताना त्याला ही भाषा खूप आवडली, त्यामुळे त्याने ती पूर्ण शिकण्याचा निर्णय घेतला. आमिरने त्यासाठी एका टय़ूटरची नेमणूक केली आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच आमिरने सांगितले होते की, तो प्रत्येक वर्षी काही ना काही नवे शिकण्याचा प्रयत्न करतो. यापूर्वी तो पोहायला शिकला आहे.