प्रत्येक चित्रपटासाठी प्रमोशनचे नवनवे प्रकार शोधून काढण्यासाठी आमिर खान प्रसिद्ध आहे. गजनीसाठी तो न्हावी बनला, ३ इटिएटस्साठी तो गायब झाला, तर आता लवकरच रिलीज होणाऱ्या पीकेसाठीही त्याने अशीच एक कल्पना लढवली आहे. राजकुमार हिराणींच्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आमिर मानवी आकारातील बोलणारे पुतळे म्हणजेच स्टँडीचा वापर करणार आहे. आमिरच्या या पुतळ्यांना चित्रपटगृहांमध्ये ठेवले जाईल, जेव्हा एखादी व्यक्ती या पुतळ्याजवळ जाईल तेव्हा आमिर त्याच्याशी बोलायला लागेल. या पुतळ्यांमध्ये आमिरचा आवाज इन्स्टॉल केला जाईल. भारतात आजपर्यंत प्रमोशनची ही कल्पना कोणीही वापरलेली नाही. डिसेंबरमध्ये रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला या बोलणाऱ्या पुतळ्यांमुळे किती फायदा होतो, ते चित्रपट रिलीज झाल्यावरच कळू शकेल. पीके या चित्रपटात आमिरसोबत अनुष्का शर्मा, संजय दत्त, बोमण इराणी, सुशांत सिंह राजपूत यांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट १९ डिसेंबरला रिलीज होत आहे.
प्रमोशनसाठी आमिरची नवी शक्कल
By admin | Updated: August 1, 2014 23:55 IST