Join us

आमीर खानची मुलगी अडकणार विवाह बंधनात

By admin | Updated: November 5, 2016 12:48 IST

आमीर खानच्या मुलीचा 20 नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा चरखी दादरी येथे पार पडणार आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 5 - बॉलिवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान कुस्तीपटू गीता फोगटच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहे. येत्या 20 नोव्हेंबरला गीताचा विवाह कुस्तीपटू पवन कुमारसोबत होणार आहे. हा लग्नसोहळा चरखी दादरी येथे होणार असून संगीत आणि मेहंदीचा कार्यक्रम 19 नोव्हेंबर रोजी असणार आहे.  
 
आमीर खानचा आगामी बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित सिनेमा 'दंगल' फोगट कुटुंबावरच आधारित आहे. या सिनेमात आमीर गीता फोगटचे वडील महावीर फोगट यांच्या भूमिकेत दिसणार आहेत.  लग्नसोहळ्यात ऑन स्क्रीन बाबा आमीरसह दंगल सिनेमातील अभिनेत्री आणि दिग्दर्शक नीतेश तिवारीदेखील उपस्थित राहणार आहेत.
 
'दंगल' सिनेमाच्या शुटिंगनिमित्ताने आमीर फोगट कुटुंबीयांच्या अगदी जवळ आला असून त्यांचे कौटुंबिक संबंध निर्माण झाले आहेत.  जेव्हा आमीरला फोगट कुटुंबीयांनी गीताच्या लग्नाचे निमंत्रण दिले तेव्हा त्याने लग्नसोहळ्यात निश्चित सहभागी होणार असल्याचे सांगितले. 
आणखी बातम्या
 
स्वतः आमीर खान लग्नाला येणार असल्याने 27 वर्षांची गोल्ड मेडलिस्ट कुस्तीपटू गीता फोगट खूपच खूश झाली आहे. दरम्यान 'दंगल' सिनेमात प्रेक्षकांना कुस्तीपटू गीता आणि तिची बहीण बबिता कुमारी यांचा आतापर्यंतचा प्रवास मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.