बॉलिवूडचा 'मिस्टर परफेक्शनिस्ट' आमिर खान सध्या त्याच्या एका खास भेटीमुळे चर्चेत आला आहे. प्रसिद्ध गायक अरिजीत सिंह याने अवघ्या आठवड्यापूर्वीच पार्श्वगायनातून निवृत्ती घेण्याची घोषणा करून चाहत्यांना धक्का दिला होता. अशातच आमिर खान थेट अरिजीतच्या पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमधील जियागंज येथील घरी पोहचला.
अरिजीत सिंह हा आपल्या साध्या राहणीमानासाठी ओळखला जातो. आमिरने त्याच्या घरी जाऊन केवळ भेटच घेतली नाही, तर त्याच्यासोबत घराच्या छतावर पतंग उडवण्याचा आनंदही लुटला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओंमध्ये आमिर खान पतंग उडवताना पाहायला मिळतोय. या दोन दिग्गजांना एकत्र पाहण्यासाठी जियागंजमध्ये चाहत्यांची मोठी गर्दी जमली होती.
अधिकृतपणे या भेटीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. सोशल मीडियावर सध्या अशी चर्चा रंगली आहे की, आमिर खानने अरिजीत च्या निवृत्तीच्या निर्णयावर फेरविचार करण्यासाठी आणि त्याचे मन वळवण्यासाठीच ही खास भेट घेतली असावी. तर काही रिपोर्ट्सनुसार, अरिजीत आमिरच्या एका नवीन चित्रपटासाठी संगीत तयार करत आहे.
आमिर-अरिजीतची सुपरहिट जोडीअरिजीत सिंहने आमिर खानच्या अनेक चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत, जी आजही प्रेक्षकांच्या ओठावर आहेत. ज्यात 'दंगल' चित्रपटातील 'नैना', 'लाल सिंग चड्ढा'मधील 'तेरे हवाले' आणि 'फिर ना ऐसी रात आयेगी' या गाण्यांचा समावेश आहे.
Web Summary : Aamir Khan visited Arijit Singh at his West Bengal home after the singer announced his retirement. They flew kites together. The reason for the visit is speculated to be about Arijit reconsidering retirement or working on music for Aamir's new film. They have a successful track record.
Web Summary : गायक अरिजीत सिंह के संन्यास की घोषणा के बाद आमिर खान पश्चिम बंगाल में उनके घर पहुंचे और पतंग उड़ाई। अटकलें हैं कि आमिर, अरिजीत को फैसले पर पुनर्विचार करने या फिल्म के लिए संगीत पर काम करने के लिए मनाने गए थे। उनकी सुपरहिट जोड़ी रही है।